डॉक्टर, हीच औषधं द्यायची ना? या गोळ्या दिवसातून किती वेळा घ्यायच्या? या गोळ्या जेनेरिक आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार झोलणाऱ्या डॉक्टरांना फार्मासिस्ट आणिय सामान्यांना सहज समजावे यासाठी प्रीस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्ये लिहिण्याची सक्ती करण्याचा विचार आरोग्य मंत्रालय आणिह मेडिकल कौन्सिल करत आहे. पण त्याही पुढे जाऊन या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून ‘सेफ प्रीस्क्रिप्शन’ हे कम्प्युटर अॅप्लिकेशनच तयार होत आहे. हव्या त्या भाषेत आणिा प्रिंटेड प्रीस्क्रिप्शन उपलब्ध करून देणारे हे अॅप्लिकेशन असून लवकरच ते डॉक्टरांसाठी उपलब्ध होणार आहे.
डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शन्सवरील न समजणारे अक्षर हा अनेक दशकांपासून वादाचा मुद्दा आहे. डॉक्टरचे प्रीस्क्रिप्शन हे फक्त केमिस्टलाच कळते, असेही गमतीने म्हटले जाते. परंतु, न कळणाऱ्या प्रीस्क्रिप्शनमुळे चुकीची औषधे देणे, डोस चुकीचे घेणे अशा गोष्टीही होत असतात. यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या शिफारशीनंतर आरोग्य विभागही डॉक्टरांना प्रीस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्येच लिहावे अशी सक्ती करण्याच्या विचारात आहे. परंतु, यावर तोडगा काढण्यासाठी पेशंट सेफ्टी अलायन्स ही स्वयंसेवी संस्था ‘सेफ प्रीस्क्रिप्शन’ हे कम्प्युटर अॅप्लिकेशन तयार करत आहे. यात कम्प्युटरच्या माध्यमातून प्रिंटेड प्रीस्क्रिप्शन देणे शक्य होणार आहे, तसेच औषधे कधी, कशी घ्यायची, पुढील अपॉइंटमेंट कधी ही माहिती पेशंटला कळणाऱ्या भाषेत देण्याचीही सुविधाही मिळेल. Continue reading →