Category Archives: Media

वेदनारहित जगण्याचा हक्क हवा!

old ageआसन्नमरण स्थितीत ४२ वर्षे जगलेल्या अरूणा शानबाग यांचे देहावसान झाले आणि ‘इच्छामरण-दयामरण’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. माणसाला सन्मानाने जगण्याचा जसा हक्क आहे तसाच सन्मानाने मरण्याचाही हक्क हवा, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढते आहे, पण या हक्काकडे संशयाने बघणाऱ्यांच्या शंकांचेही निरसन झालेले नाही…

रात्री दोनच्या सुमारास मित्राचा फोन आला. त्याची आई यकृताच्या आजाराने ग्रस्त होती. हा आजार दुर्धर आहे आणि त्यावर काही उपाय नाही, हे आईसकट सर्वांनाच ठाऊक होते. मित्र फोनवर रडतरडत म्हणाला, ‘लगेच हॉस्पिटलला ये.’ मी पोहोचलो, तर त्याच्या आईला प्रचंड वेदना होत होत्या. साधारण वेदनाशामक औषधे देऊन झाली होती, पण फार फरक पडला नव्हता. आई आणि मुलगा दोघेही याचना करत होते, अजून तीव्र वेदनाशामक औषधांची. अतिशय कडक असे वेदनाशामक किंवा झोपेचे औषध दिले, तर श्वसनाच्या क्रियेवर ताण पडणार. कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) ठेवायला संमती द्यायची नाही, हे आधीच ठरले होते. झोपेचे इंजेक्शन देऊन, गरज दिसत असताना व्हेंटिलेटरवर न ठेवणे म्हणजे कुठेतरी ‘डॉक्टरांनी जीव जायला मदत केली’ असे होणार होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मित्राने मला बोलावले असले, तरी यावर कुठलाही तोडगा नव्हता. रुग्णाच्या नातेवाईकांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आपापल्या परीने बरोबर होते.

तेव्हाच मला काही वर्षांपूर्वीची घटना आठवली. दिल्लीतील एक इंजिनीयर त्याच्या आईच्या मृत्यूबाबत सांगत होता. ७५ वर्षांच्या मधुमेह, रक्तदाब, किडनी खराब झालेल्या त्याच्या आईला हॉस्पिटल मध्ये राहायचे नव्हते. त्याच्या भावांनी म्हणे जमीन जुमल्याच्या मोहापायी डॉक्टरांना ‘विकत घेऊन’ तिला घरी आणले आणि लगेच आईचे निधन झाले. ‘रुग्ण काहीही म्हणाला तरी डॉक्टरांनी घरी कसे पाठवले? त्यामुळे हा अपमृत्यू आहे’ म्हणून हा गृहस्थ डॉक्टरांविरुध्द केस करायला निघाला होता.

अशा असंख्य आणि वेगवेगळे कंगोरे असलेल्या अप्रिय घटना वारंवार समोर येतात. त्यात कधी रुग्ण आणि नातेवाईक भरडले जातात, तरी कधी डॉक्टर. एकंदरितच कायदा, वैद्यकीय कायदा, पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि समाज म्हणून आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती तोकडा, अपुरा आणि उथळ आहे याची जाणीव पुन्हा झाली ती अरुणा शानबाग यांच्या निधनाने.

खरेतर प्रायोपवेशनाने अर्थात इच्छामरणाने आपले जीवन संपवण्याचे दाखले आपल्याकडे काही कमी नाहीत, किंवा ‘संथारा’ घेऊन अन्नपाणी त्यागून अत्यंत संयतपणे मृत्यूला सामोरे जाणेही. यात एकच संकल्पना दिसते ती म्हणजे असहाय्यपणे किंवा दुबळेपणाने मृत्यूला सामोरे न जाता, सन्मानाने मृत्यूला कवटाळणे. इच्छामरण आणि दयामरण यांपैकी इच्छामरण हा शब्द मला अधिक योग्य वाटतो. कुणीतरी दया म्हणून किंवा दयनीय अवस्था बघून मरण देणे, म्हणजे दया मरण. तर स्वतःच्या हक्काने जगणे आणि तसेच मृत्यूला सामोरे जाणे म्हणजे इच्छामरण! एखादा दुर्धर, बरा न होणारा आजार, ज्यामुळे जीवन परावलंबी होते आणि औषधोपचार हे केवळ मरण लांबवण्याखेरीज फारसे काम करत नाहीत, तेव्हा माणूस विचार करतो तो स्वेच्छेने मरण्याचा. Death with dignity (सन्मानजनक मृत्यू) किंवा इच्छामरण, हा हक्क असायला हवा. स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, अमेरिकेतील काही राज्य अशा अनेक ठिकाणी इच्छामरणाचा कायदा अस्तित्त्वात आहे. रुग्णाला खरंच मरणाची इच्छा आहे का, की तो केवळ वैफल्यापोटी किंवा भीतीपोटी असे म्हणतो आहे, याची साक्षेपी चाचपणी करुन डॉक्टरी सल्ल्याने औषध देऊन मृत्यूला कवटाळण्याचा अधिकार या देशातील नागरिकांना आहे. भारतात अशा तरतुदींचा गैरवापर होईल ही भीती आहे, आणि ती संपूर्णपणे खोटी आहे असे मी म्हणणार नाही. पण ह्या भीतीपोटी लोकांना मरणप्राय वेदना सहन करत लाचारीने जगण्याची शिक्षा देणे, हे कितपत बरोबर आहे?

मरणाचा नसला तरी, आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिलेला आहे. त्यासाठी दुर्धर आजाराने वेदनाग्रस्त असलेल्या लोकांना palliative care ही मिळायलाच हवी. palliative care चा अर्थ जगण्यासाठी आणि वेदनारहित जगण्यासाठी माफक स्वरुपात मदत करणे. मरण न लांबवता तोपर्यंत माणसाचे जीवन सुकर करणे, म्हणजे पॅलिएटिव्ह केअर. नैसर्गिकरित्या मृत्यू येई पर्यंत वेदनारहित जगण्याचा हक्क तरी प्रत्येक नागरिकाला असलाच पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा असायलाच हवी. ती देताना किंवा वेदनामुक्ती करताना मरण ओढवले, तर त्याला अपमृत्यू म्हणता कामा नये ही प्रगल्भ जाणीव डॉक्टर, पोलिस, कायदा आणि समाज यांना असायला हवी.

तीच गोष्ट आहे, लिव्हिंग विल बाबतीत. विस्मयकारक वैद्यकीय प्रगतीमुळे आज माणसाचे मरण लांबवणे शक्य आहे. श्वसन यंत्रणा, हृदय, यकृत, किडनी सगळे एकत्र काम करेनासे झाले तरी मरण लांबवणे शक्य आहे. पण जर असे करण्याची इच्छाच त्या व्यक्तीची नसेल तर? अशावेळी ती व्यक्ती इच्छापत्र तयार करुन आपल्याला नेमके कशाप्रकारचे आणि कुठपर्यंत उपचार द्यावेत याविषयी सुस्पष्ट सूचना देऊ शकते. पण दुर्दैवाने इच्छापत्राला सुध्दा भारतीय कायद्यात विशेषतः फौजदारी कायद्यात स्थान नाही. मुळात आपल्या कायद्यात आत्महत्या आणि इच्छामरण यात फरक केला जात नाही. आपल्या देशात आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे साहजिकच इच्छामरण हाही गुन्हाच ठरतो आणि आपल्या इच्छेनुसार देहत्याग करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर त्याला जगण्यासाठी मदत न करणे हाही एक गुन्हाच ठरतो. अरुणा शानबाग यांना इच्छामरण देण्यासाठी पत्रकार पिंकी विराणी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर, त्यावर कोर्टाने निकाल देताना अनेक प्रगतीशील निरीक्षणे नोंदविली होती. इच्छामरण हा गुन्हा नाही, इच्छामरणाची तरतूद असली पाहिजे, असे निरीक्षण नोंदविताना आत्महत्या हा गुन्हा ठरवणारे कलम काढून टाकण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते, पण त्याचे पालन अजूनही झालेले नाही.

याच निकालात सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची याचिका कधी दाखल करता येईल याविषयीही मार्गदर्शन केले आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेले उपाय अपुरे आहेत. पण नक्कीच या विषयावर सकारात्मक दृष्टिकोन आहे असे म्हणता येईल.

अशा याचिकांवर निर्णय देताना डॉक्टरांची मदत घ्यावी आणि त्यासाठी प्रत्येक उच्च न्यायालयाने न्यूरोसर्जन, मानसोपचारतज्ज्ञ आणि फिजिशियन अशी त्रिसदस्यीय टीम तयार करावी असे निकालात म्हटले आहे. पण भारतातील किती उच्च न्यायालयांनी अशा टीम तयार केल्या आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. आधी म्हटल्याप्रमाणे मित्राची आई आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करणे आणि त्याचबरोबर रुग्ण वेदनेने विव्हळत असेल, तर त्याच्या वेदनांचं शमन करणे हेही डॉक्टरचे कर्तव्यच आहे. मग यातून नेमका निर्णय कसा घ्यायचा? त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय ज्ञान, नैतिक पाठबळ आणि कायदेशीर संरक्षण हा आकृतीबंध असायला हवा. त्यासाठी मेडिकल कौन्सिलपासून भारतीय दंड संहिता यांसारख्या अनेक कायद्यांत बदल करायला हवेत आणि या आकृतीबंधाचे तंतोतंत पालन करणाऱ्या डॉक्टरला कायदेशीर संरक्षणही मिळायला हवे. वाढणारे आयुर्मान, वैद्यकीय प्रगती या पार्श्वभूमीवर इच्छामरणावर साधकबाधक चर्चा होणे ही काळाची गरज आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त जीवनेच्छा संपलेले लोक वेदना सहन करत आपल्या मृत्यूची वाट पाहत, मरत-मरत जगत आहेत. त्यांच्या इच्छेने त्यांना वेदनामुक्ती देणे, त्यांचा सन्मान करणे हीच त्यांची अखेरची इच्छा असू शकते. आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तरी अरुणा यांचे जीवन-मरण आणि पिंकी विराणी यांनी दिलेला लढा सार्थकी लागला असे म्हणता येईल.

डॉ. निखिल दातार

(लेखक वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि रुग्ण हक्क चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

Nikhil-Datar-News-in-Times-of-India

Abortions by midwives, ayurved and homoeopath doctors set to be legalized

Nikhil-Datar-News-in-Times-of-IndiaThe new Medical Termination of Pregnancy (Amendment) draft bill says abortions can be performed not only by allopathic doctors but by Ayurvedas, homoeopaths and midwives as well.

The draft bill, put up on the Union health ministry’s website for suggestions on Thursday, has increased the abortion limit from the present 20 weeks to 24 weeks. “The draft says there is no time limit in case doctors detect a foetal abnormality,” said gynecologist Dr Nikhil Datar, who took the issue to the Supreme Court six years ago while treating Bhayander resident Niketa Mehta.

Mehta’s unborn baby was detected with heart anomaly, prompting her to seek an abortion beyond the 20-week period. Two other Mumbaikars—allowed by the Supreme Court to only be identified as Mrs X and Mrs Y (see box)—joined Datar’s petition last year.

Experts believe the draft bill is one of the most liberal abortion documents. “This is the biggest advancement of women’s rights since the passage of the MTP Act in 1971,” said Vinod Manning of Ipas, an international NGO that works for the right to safe abortions. Indian women not only have to travel 20 to 45km to get access to an abortion centre, but one dies every two hours due to unsafe abortions, shows an Ipas study.

फॅमिली डॉक्टरचे महत्त्व

doctorआपल्या देशात आयुर्वेदासारख्या शास्त्राची जोड आधुनिक वैद्यकाला देऊन एक परिपूर्ण अशी आरोग्यव्यवस्था बनवायला हवी होती, पण झाले उलटेच! अजूनही ‘डॉक्टर कमी आहेत’ अशी बोंबाबोंब करून, नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडून देणग्या घेऊन डॉक्टर बनवण्यापेक्षा असलेल्या आयुर्वेदिक, होमियोपथिक डॉक्टरांना थोडेसे शिक्षण देऊन त्यांच्यातून अधिक परिपूर्ण जीपी किंवा फॅमिली डॉक्टर आपण बनवू शकतो. यूकेने त्यांच्याकडील डॉक्टरांच्या कमतरतेवर तोडगा काढलाय. त्यांनी त्यांच्या देशातील नस्रेसना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना एका ठरावीक परिघात आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली जी.पी.सारखे काम करण्याचा अधिकार दिला आहे. आणि आपण मात्र डॉक्टरांची जातीव्यवस्था बनवून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून बसलो आहोत.. Continue reading

Here’s a legible prescription for doctors – app Safe Rx

Safe-prescription-appTo make prescribing medicines a patient-friendly experience, leading gynecologist and founder of NGO-Patient Safety Alliance (PSA), Dr Nikhil Datar, has come up with an app named ‘Safe Rx’ that will be launched soon.

With the Food and Drugs Administration (FDA) and government health officials emphasizing on the need to have eligibly written prescriptions, Datar says that this app will not only make the doctor give legible prescription but it will also have the facility to translate the instructions in 14 Indian languages. Continue reading

एक सम्यक प्रयोग

ek-samyak-prayogरुग्णालयात बलात्काराची केस आली की त्यात डॉक्टर, पोलीस यंत्रणा आणि नंतर न्यायव्यवस्था सहभागी होत असते. अशा वेळी अशी केस गुन्हेगारी प्रकरण म्हणून हाताळावी का? त्यासाठी सर्वच रुग्णालयांत एकसारखी व्यवस्था आहे का? या संदर्भातली नेमकी प्रक्रिया काय, या विचारमंथनातून तयार झाला तो एक सम्यक प्रोटोकॉल, एक सम्यक प्रयोग, बलात्काराच्या सर्व प्रकरणांमध्ये लागू पडणारा. ज्यामध्ये पीडित महिलेला तपासण्यापासून, उपायांपासून, समुपदेशनापर्यंत बाबींचा अंतर्भाव होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘बलात्कार आणि आरोग्यव्यवस्थेचा सुयोग्य प्रतिसाद’ या चर्चासत्राच्या निमित्ताने.

मी मानद स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून महापालिकेच्या कूपर रुग्णालयात नुकताच रुजू झालो होतो. एका संध्याकाळी तेथील निवासी डॉक्टरचा फोन आला. ‘एक बलात्काराची केस आली आहे.’ ती मुलगी १६ वर्षांची होती आणि कुठलीही मोठी शारीरिक दुखापत तिला झालेली नव्हती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या स्त्री डॉक्टर वैद्यकीय कामात निष्णात होत्या, पण तरीही अशा परिस्थितीत (बलात्काराची केस आल्यावर) नेमके काय करायचे असते हे काही त्यांच्या लक्षात येत नव्हते. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांला ‘न्यायवैद्यकशास्त्र’ हा विषय शिकवला जातो, चार सहा मार्काचा प्रश्नसुद्धा येतो. पण दुसऱ्या वर्षांला असताना तो वाचणे आणि त्यानंतर अनेक वर्षांनी प्रत्यक्षात एखादी केस हाताळणे यांत जमीनअस्मानाचा फरक असतो. त्यातून अशा परिस्थितीत असलेल्या मुलीशी संवाद साधणे, तिला बोलते करणे, धीर देणे, माहिती घेणे, ती लिहिणे. Continue reading

Doctors, activists join hands for patient safety

MUMBAI: A few months ago, a nurse in a well-known hospital in Pune admitted to having administered a wrong injection to a patient. Though nothing major happened to the patient, the nurse, who was known to be meticulous and hard-working all her life, told the doctor about the incident. She said it was during the time of an emergency and the confusion had occurred because of two similar-looking, similar-sounding medicines.

While it may be considered as a case of medical negligence, most will agree that this was a genuine human error—something that can happen to anyone. Unintended medical errors, in fact, are the leading cause of deaths all over the world, say experts. Recognizing that healthcare errors impact one in every 10 patients around the world, the World Health Organization (WHO) calls patient safety an endemic concern.

A group of doctors, activists and legal consultants have therefore come together to form ‘Patient Safety Alliance’, an initiative that will empower patients and create a movement to promote awareness of patient safety and take action to reduce harm in healthcare. Continue reading

चुकीच्या औषधांचा जीवावरचा खेळ टाळण्यासाठी…

औषधे चुकीची वा चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याने तसेच पेशन्ट व डॉक्टरांमधील संवाद खुंटल्याने कित्येक जणांच्या जीवावर बेतते. त्यामुळे सर्व स्तरावर अशा चुका टाळण्यासाठी व सुरक्षित वैद्यकसेवेचा प्रघात प्रचलित करण्यासाठी आता नामवंत डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आहे. लक्षावधी पेशन्ट व डॉक्टरांनाही दिलासा देणारे ‘पेशन्ट्स सेफ्टी अलायन्स’ हे व्यासपीठ त्यातूनच रविवारी आकारास आले.

औषधे किंवा वैद्यकसेवा चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याचे प्रमाण जगभरात शंभरास पाच ते सहा इतके आहे. विकसित राष्ट्रांमध्येही डब्ल्यूएचओच्या अभ्यासानुसार दहा पेशन्टमागे एकास अशा चुकीच्या औषध/उपचार पद्धतीमुळे दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. भारतात तर ते कमालीचे अधिक असले, तरी त्याचे मोजमापच होत नाही. या प्रकाराचे प्रथम रिपोर्टिंग करणाऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ शकते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी ‘पेशन्ट््स सेफ्टी अलायन्स’ची स्थापना करणार असल्याचे याकामी पुढाकार घेणारे डॉ. निखिल दातार यांनी सांगितले. या अलायन्समध्ये डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. संजय ओक, राज्य ग्राहक तंटा निवारण मंचाचे अध्यक्ष न्या. वग्यानी, हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ प्रमोद लेले, पोलिस अधिकारी प्रज्ञा सरवदे, संशोधक बाळ फोंडके, राजीव मधोक आदी वैद्यक व अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी आहेत.

पेशन्ट्स सेफ्टी अलायन्स काय करणार?

  • दजेर्दार व सुरक्षित वैद्यकसेवेच्या मागणीबाबत पेशन्टना सजग करणे.
  • पेशन्टना कार्यसत्रांद्वारे त्यांच्या हक्कांबाबत जागरुक करणे
  • इंटरनेटवरून विकारांबाबतची तसेच अन्य माहिती शोधण्यास मदत.
  • संसर्ग प्रतिबंधासाठी काय करावे?
  • दिसण्यात तसेच नावांमध्ये सार्धम्य असल्याने औषधांचे होणारे घोटाळे टाळणे.
  • चुका टाळण्यासाठी पद्धती बदलण्यास प्राधान्य.
  • पेशन्टप्रमाणेच डॉक्टर व अन्य स्टाफचेही प्रबोधन.
  • गरज भासल्यास कोर्टाच्या पायरीवर लढा.

महाराष्ट्र टाइम्स (२६ एप्रिल २०१२)

डॉक्टरांसाठी सेफ प्रीस्क्रिप्शन

safe-prescriptionडॉक्टर, हीच औषधं द्यायची ना? या गोळ्या दिवसातून किती वेळा घ्यायच्या? या गोळ्या जेनेरिक आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार झोलणाऱ्या डॉक्टरांना फार्मासिस्ट आणिय सामान्यांना सहज समजावे यासाठी प्रीस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्ये लि‌हिण्याची सक्ती करण्याचा विचार आरोग्य मंत्रालय आणिह मेडिकल कौन्सिल करत आहे. पण त्याही पुढे जाऊन या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून ‘सेफ प्रीस्क्रिप्शन’ हे कम्प्युटर अॅप्लिकेशनच तयार होत आहे. हव्या त्या भाषेत आणिा प्रिंटेड प्रीस्क्रिप्शन उपलब्ध करून देणारे हे ‌अॅप्लिकेशन असून लवकरच ते डॉक्टरांसाठी उपलब्ध होणार आहे.

डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शन्सवरील न समजणारे अक्षर हा अनेक दशकांपासून वादाचा मुद्दा आहे. डॉक्टरचे प्रीस्क्रिप्शन हे फक्त केमिस्टलाच कळते, असेही गमतीने म्हटले जाते. परंतु, न कळणाऱ्या प्रीस्क्रिप्शनमुळे चुकीची औषधे देणे, डोस चुकीचे घेणे अशा गोष्टीही होत असतात. यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या शिफारशीनंतर आरोग्य विभागही डॉक्टरांना प्रीस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्येच लिहावे अशी सक्ती करण्याच्या विचारात आहे. परंतु, यावर तोडगा काढण्यासाठी पेशंट सेफ्टी अलायन्स ही स्वयंसेवी संस्था ‘सेफ प्रीस्क्रिप्शन’ हे कम्प्युटर अॅप्लिकेशन तयार करत आहे. यात कम्प्युटरच्या माध्यमातून प्रिंटेड प्रीस्क्रिप्शन देणे शक्य होणार आहे, तसेच औषधे कधी, कशी घ्यायची, पुढील अपॉइंटमेंट कधी ही माहिती पेशंटला कळणाऱ्या भाषेत देण्याचीही सुविधाही मिळेल. Continue reading